देशातील कोणत्‍या शहराला म्‍हणतात 'City of Joy'? जाणून घ्या रंजक इतिहास

पुढारी वृत्तसेवा

भारतातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोलकाता शहराला जगभरात 'सिटी ऑफ जॉय' (आनंदाचे शहर) या नावाने ओळखले जाते.

१९८५ मध्ये प्रसिद्ध फ्रेंच लेखक डोमिनिक लॅपियर यांची कोलकाता शहरावरील 'द सिटी ऑफ जॉय' या कादंबरी प्रकाशित झाली होती.

या कादंबरीत कोलकात्यातील 'आनंद नगर' या झोपडपट्टी भागातील लोकांच्या जीवनाचे चित्रण करण्यात आले होते.

अत्यंत गरिबी आणि कष्टप्रद जीवन असूनही तिथले लोक एकमेकांना मदत करत जीवनात कसा आनंद शोधतात, याचे वास्तववादी दर्शन या कादंबरीने घडवले.

या कादंबरीतील कथा रिक्षाचालक, मजूर आणि सामान्य कुटुंबांभोवती फिरते. प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता येथील लोक ज्या प्रकारे सण साजरे करतात आणि एकमेकांच्या सुखात सामील होतात, त्यामुळेच लेखकाने या शहराला 'जॉय' (आनंद) हे विशेषण लावले.

'द सिटी ऑफ जॉय' या कादंबरीवर १९९२ मध्ये या हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने कोलकात्यामधील माणुसकी आणि जगण्‍यातील जिद्द जगासमोर आणली.

कोलकाता हे केवळ साहित्यापुरते मर्यादित नसून ते प्रत्यक्षातही उत्सवांचे शहर आहे.दुर्गापूजा, कालीपूजा आणि नाताळ दरम्यान संपूर्ण शहर रोषणाईने न्हाऊन निघते.

जगभरात मागील काही दशकांपासून कोलकाताला 'द सिटी ऑफ जॉय' या कादंबरीतून ओळखले जाते. मात्र मागील एक शतकांहून अधिक काळ येथील नागरिकांनी आपल्या जिवंतपणाने, कलेने आणि साहित्याने हे नाव यापूर्वीच सार्थक केले आहे.

येथे क्‍लिक करा.