Tea Recipe | चहात आधी आलं की चहापत्ती? जाणून घ्या ‘टपरी स्टाइल’ रेसिपी

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात हातात गरमागरम आणि कडक ‘टपरी’वरचा चहा नसेल, तर पावसाची मजाच काहीशी अपुरी वाटते

अनेकदा चहा बनवताना दूध आणि पाणी चुकीच्या पद्धतीने घातले जाते किंवा मसाल्यांचे योग्य प्रमाण साधता येत नाही. त्यामुळे चवीचे गणित बिघडते

टपरीवरील चहाचे वैशिष्ट्य त्याच्या सुगंधात आणि चवीत दडलेले असते. हा चहा थेट मनाला भिडतो

पावसाळ्यात गरमागरम चहाची चव आणि सुगंध आनंद द्विगुणित करण्यासाठी टपरी स्टाइल’ चहा बनविण्याची योग्य रेसिपी जाणून घेऊया

सर्वप्रथम एका पातेल्यात किंवा चहाच्या पातेलीत १ कप पाणी घ्या आणि गॅसवर ठेवा.

पाणी थोडे गरम झाले की त्यात किसलेले आलं घाला. याच वेळी ठेचलेली वेलची घाला. वेलची ठेचून घातल्यास तिचा सुगंध चहात चांगला मिसळतो

आल्याचा सुगंध येऊ लागल्यानंतर त्यात चहापत्ती घाला. चहापत्ती पाण्यात किमान २ ते ३ मिनिटे उकळू द्या. त्यानंतर त्यात दूध घाला आणि चहा उकळी येईपर्यंत थांबा

चहाला उकळी आल्यानंतर शेवटी साखर घाला. साखर घातल्यानंतर चहाला फक्त एक उकळी येऊ द्या. उकळी येताच गॅस बंद करा आणि चहा गाळणीने गाळून घ्या

सुरुवातीलाच पाण्यात आलं घालून ते उकळल्यास आल्याचा सुगंध आणि चव पाण्यात तसेच नंतर घातलेल्या चहापत्तीत चांगल्या प्रकारे मिसळून कडक चव येते

येथे क्लिक करा