Melody chocolate launch: पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनींना भेट दिलेले ‘Melody’ चॉकलेट कधी झाले लॉन्च?

पुढारी वृत्तसेवा

इटली दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारतातील लोकप्रिय ‘Melody’ टॉफी गिफ्ट केली असून, या गिफ्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

चला जाणून घेऊया, पारलेचे प्रसिद्ध 'Melody’ चॉकलेट कधी तयार झाले?

'Melody’ ही भारतातील सर्वात जुनी आणि सुप्रसिद्ध कंपनी असलेल्या पारले प्रॉडक्ट्सने तयार केली होती.

पारलेने सुमारे ४१ वर्षांपूर्वी, १९८३ मध्ये ही चॉकलेट बाजारात आणली होती.

'Melody’ने १९८० आणि ९० च्या दशकात भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि लवकरच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय झाली.

एक काळ असा होता की हे चॉकलेट फक्त ५० पैशांना मिळत असे. वाढत्या महागाईनंतरही, ती आजही भारतातील जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या दुकानात फक्त एक रुपयाला सहज उपलब्ध आहे.

चौहान कुटुंबाने सुरू केलेल्या या कंपनीने सुरुवातीला मिठाई आणि टॉफ्या बनवण्यास सुरुवात केली.

त्यानंतर १९३९ मध्ये कंपनीने बिस्किट व्यवसायात पाऊल ठेवले आणि 'पारले-जी' सारख्या ब्रँडच्या माध्यमातून भारतातील घराघरांत स्थान मिळवले.

उन्हाळ्यात कॉफी पिल्यावर शरीरात काय बदल होतो?

येथे क्लिक करा