Gut Health : जेवणानंतर लगेच पाणी पिताय? थांबा! महर्षी वाग्भट्टांनी सांगितली योग्य वेळ वाचाच!

पुढारी वृत्तसेवा

'अष्टांग हृदयम्'चे रचनाकार महर्षी वाग्भट्ट यांनी पाणी पिण्‍याच्‍या सवयींवर मोलाचे सूत्र दिले आहे.

जेवण संपताच लगेच पाणी प्यायल्यास शरीराचा समतोल बिघडू शकतो आणि पुढे अनेक मोठे आजार उद्भवण्याचा धोका वाढतो.

पोटात पेटलेला जठराग्नी जेवणानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने क्षीण होतो किंवा थंडावून जातो.

अन्नाचे नीट पचन होण्यासाठी जठराग्नी टिकून राहणे गरजेचे आहे; ती विझल्यास अन्न पचण्याऐवजी पोटात कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.

अन्न अर्धवट पचल्याने शरीरात 'आम' म्हणजेच विषारी घटक साठतात; १०३ हून अधिक व्याधींची हीच सुरुवात मानली जाते.

आयुर्वेदिक नियमांनुसार जेवण झाल्यानंतर सुमारे एक ते दीड तासाचा अवधी देऊनच पाणी पिणे उत्तम मानले जाते.

पचनाची पहिली पायरी व्यवस्थित पार पडल्यानंतर पाणी घेतल्यास शरीराला त्याचा खरा फायदा मिळतो.

'अष्टांग हृदयम्'नुसार जेवणानंतर ताक, दिवसाअखेरीस दूध आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

येथे क्‍लिक करा.