Rahul Shelke
बजेटमधील योजना आणि सवलती प्रत्यक्षात कधी लागू होतात, हे जाणून घ्या.
दरवर्षी 1 फेब्रुवारीला केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करते. पण बजेट जाहीर होताच दुसऱ्या दिवसापासून सगळे बदल लागू होतील, असे नाही.
बजेट म्हणजे सरकारचा आर्थिक आराखडा असतो. यात योजना, करबदल आणि खर्चाचे प्रस्ताव मांडले जातात.
1 एप्रिल ही सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे. भारताचं नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होतं.
इनकम टॅक्स, सबसिडी, सरकारी खर्च आणि बहुतेक योजना 1 एप्रिलपासूनच लागू होतात.
काही निर्णयांचा फायदा मात्र लगेच मिळतो. उदा. कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी किंवा काही करदरांमधील बदल.
नवीन योजना जाहीर झाल्यावर नियम, पात्रता, अर्ज प्रक्रिया ठरवावी लागते. म्हणून अशा योजनांना वेळ लागतो.
रस्ते, रेल्वे, विमानतळ, मोठे प्रकल्प जाहीर लगेच होतात, पण प्रत्यक्ष फायदा दिसायला 1 ते 2 वर्षेही लागू शकतात.
आधीच सुरू असलेल्या योजनांचं बजेट वाढलं, तर त्याचा फायदा तुलनेने लवकर मिळतो.
कारण यंत्रणा आधीच तयार असते.
बजेटमधील प्रस्तावांना संसदेत मंजुरी आवश्यक असते. फायनान्स बिल मंजूर झाल्यानंतरच बदल कायदेशीररित्या लागू होतात.