Namdev Gharal
सँडफिश स्किंक हा मासा नसून एक सरडा आहे. पण तो वाळूमध्ये पाण्याप्रमाणे पोहू शकतो म्हणूनच याला 'सँडफिश' असे म्हणतात.
हा प्रामुख्याने उत्तर आफ्रिकेतील सहारा वाळवंट आणि अरबी द्विपकल्पातील उष्ण, वाळंवटी भागात आढळतो.
याचे शरीर विमानासारखे निमूळते असते आणि तोंड टोकदार असते, ज्यामुळे वाळूत शिरणे याला सोपे जाते.
याच्या अंगावरील खवले अत्यंत गुळगुळीत आणि चकचकीत असतात. यामुळे वाळू आणि शरीरातील घर्षण कमी होते आणि याच्या अंगाला वाळू चिकटत नाही.
याचे वैशिष्ट्ये म्हणजे हा सरडा वाळूच्या पृष्ठभागाखाली सुमारे ६ इंच खोलीपर्यंत अतिशय वेगाने प्रवास करू शकतो.
शत्रूची चाहूल लागताच किंवा अति उष्णतेपासून वाचण्यासाठी हा काही सेकंदात वाळूच्या आत स्वताला गाडून घेतो.
वाळू डोळ्यात जाऊ नये म्हणून याच्या डोळ्यांवर पारदर्शक पडदा असतो आणि कानांची छिद्रे विशेष खवल्यांनी झाकलेली असतात
सँन्डफिशचा मुख्य आहार हा किटक आहे. वाळूवर होणाऱ्या सूक्ष्म कंपनांवरून तो आपले भक्ष्य (कीटक, टोळ, कोळी) यांचा शोध घेतो.
याचा रंग वाळूशी मिळताजुळता म्हणजे फिकट पिवळा किंवा तपकिरी असतो, ज्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. हे त्याला नैसर्गिकरीत्या लपण्यास मदत करते.
पूर्ण वाढ झालेला सँडफिश स्किंक साधारण ४ ते ६ इंच लांब असतो.