पुढारी वृत्तसेवा
थंड प्रदेशात शतकानुशतके पिलं जाणारं याकचं दूध आता ट्रेंडमध्ये आहे. चला जाणून घेऊया याचे जबरदस्त फायदे.
याकच्या दुधात प्रथिनं (Protein) गाईच्या दुधापेक्षा जास्त असतात. मसल्स मजबूत होण्यास आणि शरीराच्या वाढीस मदत होते.
याकच्या दुधात महत्त्वाचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीराला संसर्गाशी लढायला मदत होते.
कॅल्शियम + फॉस्फरसचा चांगला स्रोत. या दुधात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असतात. मुलं आणि वृद्धांसाठी हाडं मजबूत ठेवण्यात फायदेशीर.
याकच्या दुधातील नैसर्गिक फॅट्स आणि एन्झाइम्स पचन सुधारायला मदत करतात.
याकच्या दुधात चांगल्या प्रकारचे उपयुक्त फॅट्स असतात. यामुळे दिवसभर ऊर्जा टिकते आणि थकवा कमी जाणवतो.
योग्य प्रमाणात घेतल्यास याकचं दूध चांगल्या फॅट्समुळे हृदयाच्या आरोग्याला सपोर्ट देऊ शकतं.
याकच्या दुधात व्हिटॅमिन A आणि E असतात. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि चमक येते.
हिमालयात याकचं दूध थंडीपासून संरक्षणासाठी पितात. यातील फॅट्स शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतं.
याकच्या दुधात असे पोषक घटक असतात जे मेंदूच्या कार्याला सपोर्ट करतात. एकाग्रता वाढण्यास मदत होऊ शकते.