Foot Health Indicators | तुमचे पाय देतात आरोग्याचा इशारा : दुर्लक्ष न करता ओळखा 'हे' ८ संकेत

अविनाश सुतार

पायांमध्ये दिसणारे काही बदल किंवा समस्या या केवळ पायांपुरत्याच मर्यादित नसून, शरीरातील इतर आजारांचे संकेत असू शकतात

पाय किंवा घोटे सुजणे हे शरीरात पाणी साचल्यामुळे होते. यामागे हृदयविकार, मूत्रपिंड किंवा यकृताचे आजार कारणीभूत असू शकतात. तसेच प्रथिनांची कमतरताही याचे लक्षण असू शकते

घोट्यांतील वेदना दुखापत किंवा संधिवातामुळे होऊ शकतात, परंतु व्हिटॅमिन D आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊन वेदना व फ्रॅक्चरचा धोका वाढतो

पाय सुन्न होणे किंवा झिणझिण्या येणे हे नसांना झालेल्या इजेचे लक्षण असून, हे बहुतेक वेळा मधुमेहामुळे होते. व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन E यांच्या कमतरतेमुळेही हे त्रास होतात

शिरांतील झडपा कमकुवत झाल्यामुळे रक्त साचते आणि जाळीसारख्या निळ्या शिरा दिसू लागतात. व्हिटॅमिन C आणि बायोफ्लॅव्होनॉईड्सची कमतरता असल्यास हा त्रास वाढतो, .

बहुतेक वेळा टाचांची त्वचा कोरडी झाल्याने भेगा पडतात. मात्र झिंक, व्हिटॅमिन A आणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्सची कमतरता असल्यास त्वचेच्या दुरुस्तीवर परिणाम होतो

पाय थंड वाटणे हे पेरिफेरल आर्टरी डिसीज, लोहाची कमतरता (अ‍ॅनिमिया) किंवा थायरॉईडच्या आजारामुळे होऊ शकते. या स्थितींमध्ये रक्तप्रवाह व शरीराचे तापमान नियंत्रण कमी होते

प्लांटर फॅसिआयटिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाचेच्या वेदना व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे होऊ शकतात. अयोग्य पादत्राणे, जास्त हालचाल आणि अतिरिक्त वजन यामुळेही हा त्रास वाढतो

रात्री पायांना आकडी येणे हे शरीरातील पाण्याची कमतरता तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांच्या अभावाचे लक्षण असू शकते. ही खनिजे स्नायू व नसांच्या कार्यासाठी आवश्यक आहेत

येथे क्लिक करा