अविनाश सुतार
आजच्या धकाधकीच्या जीवनात लांब, दाट आणि निरोगी केस ठेवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते
प्रदूषण, ताणतणाव, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि केसांवरील रासायनिक उत्पादनांचा अतिवापरामुळे केसांचे आरोग्य धोक्यात आले आहे
योगा आणि काही व्यायामांचा अवलंब केल्यास केसांची वाढ होण्यासाठी मोठी मदत होते
काही योगासने विशेषतः प्रभावी ठरतात, कारण ती टाळूतील रक्ताभिसरण वाढवून केसांची मुळे मजबूत करतात
अधोमुख श्वानासन हे आसन ‘डाऊनवर्ड फेसिंग डॉग’ या नावानेही ओळखले जाते. या आसनात डोके खाली आणि पाय वर अशा स्थितीत शरीर ठेवले जाते
शीर्षासन शरीर व मनासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या आसनात संपूर्ण शरीर डोक्यावर संतुलित केले जाते, ज्यामुळे टाळूपर्यंत रक्ताभिसरण वाढते
उत्तानासन केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. या आसनामुळे डोक्यातील नसा, मेंदू व टाळूपर्यंत ऑक्सिजन आणि रक्तप्रवाह वाढतो. केस मजबूत, निरोगी ठेवण्यास मदत होते
बालयाम योग हा एक सोपा पण प्रभावी व्यायाम आहे. यात दोन्ही हातांच्या बोटांचे नख एकमेकांवर घासले जातात. टाळूपर्यंत संदेश पोहोचून केसांच्या मुळांना चालना मिळते
जेवणानंतर केले जाणाऱ्या वज्रासनामुळे पचनक्रिया सुधारते, शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये मिळून केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते