पुढारी वृत्तसेवा
भारतीय समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पहिले पुस्तक म्हणजे 'कास्ट्स इन इंडिया: देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट'
हे पुस्तक १९१७ मध्ये प्रकाशित झाले. त्या काळात जातिव्यवस्थेवर शास्त्रीय पद्धतीने लिहिलेले हे महत्त्वाचे संशोधन मानले जाते.
बाबासाहेबांनी ९ मे १९१६ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात हा शोधनिबंध एका चर्चासत्रात सादर केला होता.
या शोधनिबंधाचे महत्त्व लक्षात घेऊन नंतर त्याचे पुस्तकरूपाने प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकात बाबासाहेबांनी भारतीय जातीव्यवस्थेची रचना, उत्पत्ती आणि विकास याचा सखोल अभ्यास मांडला आहे.
जातीव्यवस्था केवळ सामाजिक नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रक्रियेचा भाग आहे, असे त्यांनी या पुस्तकात स्पष्ट केले.
या संशोधनातून भारतीय समाजातील जातीय भेदभाव आणि विषमता यांचे वास्तव त्यांनी मांडले.
हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जगभरातील समाजशास्त्रज्ञ आणि अभ्यासकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले.
पुढे त्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांच्या विचारांचा पाया या पुस्तकातूनच तयार झाला.
आजही भारतीय समाजव्यवस्था आणि जातिव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.