Rahul Shelke
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर BCCI ने 131 कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. आता या रकमेचे वाटप कसे होणार याची माहिती समोर आली आहे.
वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळलेल्या 15 भारतीय खेळाडूंना प्रत्येकी 6 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे. म्हणजेच खेळाडूंमध्ये एकूण 90 कोटी रुपये वाटले जाणार आहेत.
खेळाडूंव्यतिरिक्त सपोर्ट स्टाफलाही मोठा हिस्सा मिळणार आहे. एकूण 41 कोटी रुपये सपोर्ट स्टाफमध्ये वाटले जाणार आहेत.
या यादीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, बॅटिंग कोच सितांशु कोटक, असिस्टंट कोच रायन टेन डेस्काथे, बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कल आणि फील्डिंग कोच टी दिलीप यांचा समावेश आहे.
थ्रो-डाउन स्पेशलिस्ट, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच तसेच टीम डॉक्टर यांनाही या बक्षिसात वाटा मिळणार. गंभीरसह प्रत्येक सदस्याला साधारण 2 ते 3 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
भारताने 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला.
2024 टी-20 वर्ल्ड कपनंतर BCCI ने टीमला 125 कोटी रुपये दिले होते. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 58 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला आणि वर्ल्ड कपवर नाव कोरले.
संजू सॅमसनने अंतिम सामन्यात 89 धावांची शानदार खेळी केली. इशान किशनने 54 तर अभिषेक शर्माने 52 धावा केल्या.