Vastu Tips : घरातील जुन्या कपड्यांचे काय करावे? वास्‍तूशास्‍त्र काय सांगते?

पुढारी वृत्तसेवा

वास्‍तूशास्‍त्रातील नियमांचे पालन केल्यास जीवनात सकारात्‍मक बदल होतात, अशी श्रद्धा आहे.

घरात असलेल्या जुन्या कपड्यांविषयी वास्‍तूशास्‍त्रात काही नियम सांगितले आहेत.

बहुतांश जण घरात असलेले जुने कपडे फरशी पुसण्यासाठी वापरतात.

वास्‍तूशास्‍त्रानुसार, जुने कपडे फरशी पुसण्यासाठी किंवा स्‍वच्‍छतेसाठी वापरले, तर त्याचे नकारात्‍मक परिणाम होतात.

वास्‍तू आणि ज्‍योतिषशास्‍त्रानुसार, घरात  विनावापरातील जुने कपडे ठेवले तर शुक्र ग्रह कमजोर होतो.

शुक्र ग्रह हा नातेसंबंध, सौंदर्य, प्रेम आणि प्रसिद्धीचा कारक ग्रह मानला जातो.

शुक्र ग्रह कमजोर असेल, तर व्‍यक्‍तीला भावनिकदृष्ट्या अस्थिर वाटते. तसेच थकवाही जाणवतो.

तुमच्‍या घरात खूप जुने कपडे असतील, तर ते एकत्र करा आणि मिठाच्या पाण्यात भिजवून स्वच्छ करा.

मिठाच्या पाण्यात जुने कपडे धुतल्यानंतर, ते वाळवून गरजवंतांना दान करा.

मिठाच्या पाण्यात जुने कपडे धुणे शक्य नसेल, तर त्यावर कापूर टाकून घरातून बाहेर काढावे. असे केल्याने वास्‍तूमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

वरील माहिती ही वास्‍तूशास्‍त्रावर आधारित असून, ती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.

येथे क्‍लिक करा.