copper water : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना काळजी घ्या! 'या' लोकांनी सावध रहावे
पुढारी वृत्तसेवा
अनेक घरांमध्ये तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.
आयुर्वेदानुसार, विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे प्रत्येकासाठी योग्य नाही. कारण काही ठराविक लोकांना हळूहळू यामुळे नुकसान होऊ शकते.
तांब्याचे अधिक प्रमाण यकृतावर (लिव्हर) अतिरिक्त भार टाकू शकते. त्यामुळे यकृताचा त्रास असणार्यांनी ते टाळावे.
किडनीसंबंधित समस्या असणार्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये.
तांब्याची ॲलर्जी असलेल्यांना तांब्याच्या पाण्यामुळे खाज सुटणे, डोकेदुखी आणि उलट्यांसारख्या समस्या होऊ शकतात.
लहान मुले आणि गर्भवती महिलांनी तांब्याच्या भाड्यातून पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
निरोगी व्यक्तीनेदेखील तांब्याचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी फक्त १-२ ग्लासच प्यावे. कारण गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे नुकसानकारक असू शकते.
येथे क्लिक करा.