पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असल्याने त्वचा आधीच तेलकट होऊ शकते. त्यामुळे जड क्रीममुळे पिंपल्स आणि बंद छिद्रांची समस्या वाढू शकते.
चेहऱ्यावर जास्त प्रमाणात तेल लावल्यास धूळ आणि घाण चिकटून त्वचा निस्तेज दिसू शकते.
जुन्या किंवा मुदत संपलेल्या ब्युटी प्रॉडक्ट्समुळे त्वचेला संसर्ग किंवा अॅलर्जी होऊ शकते.
वारंवार स्क्रब केल्याने त्वचेचा नैसर्गिक संरक्षणात्मक थर कमजोर होऊ शकतो.
दमट हवामानात जाड फाउंडेशन आणि जड मेकअप वितळू शकतो तसेच त्वचेची छिद्रे बंद करू शकतो.
अशा उत्पादनांमुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील होऊ शकते.
लिंबामधील आम्ल त्वचेला जळजळ किंवा चिडचिड निर्माण करू शकते, विशेषतः संवेदनशील त्वचेमध्ये.
हळद, बेकिंग सोडा किंवा इतर घरगुती पदार्थांचा अति वापर त्वचेला त्रासदायक ठरू शकतो.
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे इतरांना सूट होणारे उत्पादन तुम्हालाही सूट होईलच असे नाही.