Chemical Weapons | काय आहे ‘पांढरा फॉस्फरस’? युद्धभूमीवरील भयानक शस्त्र!

पुढारी वृत्तसेवा

इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील एका गावावर 'व्हाईट फॉस्फरस'चा मारा केल्याचा गंभीर आरोप मानवाधिकार संघटना 'ह्युमन राइट्स वॉच'ने केला आहे.

'ह्युमन राइट्स वॉच'ने सात छायाचित्रांची तांत्रिक पडताळणी केली. यानंतर असा निष्कर्ष काढला आहे की, दक्षिण लेबनॉनमधील योहमोर गावातील निवासी भागात इस्रायलने व्हाईट फॉस्फरसयुक्त गोळ्यांचा वापर केला आहे.

पांढरा फॉस्फरस हा एक मेणासारखा रासायनिक पदार्थ आहे, जो ऑक्सिजनच्या संपर्कात येताच पेट घेतो.

याचा वास लसणासारखा उग्र असतो आणि हा पदार्थ ८०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावर जळतो.

शत्रूची नजर चुकवण्यासाठी 'स्मोक स्क्रीन' (धुराची भिंत) तयार करण्यासाठी याचा युद्धात प्रामुख्याने वापर होतो.

पांढरा फॉस्फरस जळताना तीव्र प्रकाश सोडतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी शत्रूचे तळ शोधण्यासाठी याचा वापर केला जातो.

पांढरा फॉस्फरस हा पदार्थ त्वचेला चिकटला तर हाडांपर्यंत खोलवर जखमा करतो. तो पाण्यातही विझत नाही!

'जीनिव्हा कन्व्हेन्शन'नुसार, नागरी वस्तीत पांढऱ्या फॉस्फरसचा वापर करणे हा युद्धगुन्हा मानला जाऊ शकतो.

आधुनिक युद्धात रासायनिक अस्त्रांचा वापर मानवी अस्तित्वासाठी मोठा धोका ठरत आहे.

येथे क्‍लिक करा.