पुढारी वृत्तसेवा
५-४-३-२-१' ग्राउंडिंग टेक्निक हे एक कॉग्निटिव्ह डिस्ट्रॅक्शन तंत्र आहे. यात आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचा (Senses) वापर करून मेंदूला चिंताजनक विचारांपासून दूर नेले जाते.
हे तंत्र पाश्चात्य क्लिनिकल सायकॉलॉजी (Clinical Psychology) मधील संशोधनाचा एक भाग आहे. याला आज जगभरातील मानसोपचारतज्ज्ञ मान्यता देतात.
मन अस्वस्थ झाल्यानंतर तुमच्या अवतीभवती दिसणाऱ्या ५ वस्तूंकडे लक्ष द्या (उदा. खिडकी, झाड, पेन्सिल).
४ वेगवेगळ्या पोत (Texture) असलेल्या गोष्टींना स्पर्श करा (उदा. फुल, सुती कापडाचामऊपणा, टेबलाचा कडकपणा).
तुमच्या कानावर पडणारे ३ आवाज ओळखा (उदा. एखादे तुम्हाला आवडणारे गाणं, पंख्याचा आवाज, पक्ष्यांचा चिवचिवाट).
२ गोष्टींचा वास घ्या (Smell) : वातावरणातील २ गंध ओळखण्याचा प्रयत्न करा (उदा. कॉफीचा सुगंध किंवा फुलांचा वास).
१ गोष्टीची चव घ्या (Taste): तुमच्या तोंडातील चव ओळखा किंवा एखाद्या गोष्टीच्या चवीची आठवण करा.
भीती किंवा ताण जाणवतो तेव्हा मेंदूचा 'अमिग्डाला' हा भाग सक्रिय होतो (Fight-or-Flight response). ग्राउंडिंग तंत्रामुळे या भागाची सक्रियता कमी होऊन मेंदूला "मी सुरक्षित आहे" असा संकेत मिळतो.
आपण गोष्टी मोजतो किंवा लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मेंदूचा Prefrontal Cortex (तार्किक विचार करणारा भाग) सक्रिय होतो. यामुळे भावनिक गोंधळ कमी होण्यास मदत होते.
हे तंत्र शरीरातील 'रेस्ट अँड डायजेस्ट' सिस्टीमला चालना देते, ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि श्वासाचा वेग मंदावून शरीर शिथिल होते.
हे तंत्र खूप तणाव आल्यानंतर उदा. परीक्षेच्या आधी, किंवा खूप जास्त विचार (Overthinking) होत असताना वापरावे.