पुढारी वृत्तसेवा
'फार्ट वॉक' म्हणजे जेवणानंतर संथ गतीने चालले जाते. जेवल्यानंतरची शतपावली.
युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल येथील रिसर्च डायटिशियन डॉ. जॉर्जिया विल्यम्स म्हणतात, जेवणानंतर चालण्याची सवय अनेक संस्कृतींमध्ये शतकानुशतके पाळली जाते.
सोशल मीडियाने या सवयीला एक नवीन आणि आकर्षक नाव दिले असेल, पण ही पद्धत अजिबात नवीन नाही.
पचनानंतर तयार होणारा गॅस शरीराबाहेर पडण्यास मदत व्हावी, यासाठी चालण्याच्या या पद्धतीला सोशल मीडियावर हे नाव मिळाले. ते लोकप्रिय झाले.
जेवणानंतर शरीराची 'पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टमसक्रिय होते, जी अन्न पचवण्यास आणि त्यातील पोषक घटक शोषून घेण्यास मदत करते.
पोटातील चांगले बॅक्टेरिया आहारातील फायबरचे विघटन करतात. या प्रक्रियेत नैसर्गिकरित्या तयार होणारा गॅस शरीराबाहेर टाकण्याची एक नैसर्गिक पद्धत आहे.
जेवणानंतर चालण्यामुळे अन्न आणि गॅस पचनसंस्थेतून पुढे सरकण्यास मदत होते, ज्यामुळे पोट जड होणे आणि अस्वस्थता कमी होते.
संशोधनानुसार, बद्धकोष्टतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी जेवणानंतर चालणे अत्यंत फायदेशीर ठरते.
जेवल्यानंतर चालण्यामुळे मूड सुधारतो, ताणतणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, जेवणानंतर ३० ते ६० मिनिटांनी चालण्यापेक्षा, जेवल्यानंतर लगेच चालल्याने रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण मिळते.
तुमच्याकडे केवळ ५ मिनिटे असली, तरी एका जागी बसून राहण्यापेक्षा तेवढा वेळ चालणे केव्हाही उत्तम, असे तज्ज्ञ सांगतात.
ज्यांना जेवणानंतर शारीरिक हालचाल केल्याने जुलाब होतात किंवा पचनाचा त्रास वाढतो, त्यांना जेवणानंतर चालणे अस्वस्थ करू शकते.
अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा आणि आहारात किंवा जीवनशैलीत योग्य ते बदल करण्याचा सल्ला देतात.