पुढारी डिजिटल टीम
राम मंदिराचा संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले आहे. आज 25 नोव्हेंबरला ध्वजारोहण सोहळा झाला.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जाहीर केले की, भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे सर्व बांधकाम पूर्ण झाले आहे.
मुख्य मंदिरासोबतच परकोट्यातील भगवान शिव, गणेश, हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती आणि देवी अन्नपूर्णा यांच्या 6 मंदिरांचे बांधकामही पूर्ण झाले आहे.
आज 25 नोव्हेंबर रोजी भव्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. संपूर्ण परिसर फुलांनी, दिव्यांनी सजवला होता.
या उत्सवासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आमंत्रण दिले होते.
निधी समर्पण अभियानात देश–विदेशातील लाखो भक्तांनी 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त दान रामललाला अर्पण केले. इतका मोठा निधी येईल अशी अपेक्षाही नव्हती.
भवन निर्माण समितीनुसार, 1500 कोटी रुपये बिलिंग पूर्ण (आतापर्यंतचा खर्च), एकूण अंदाजे खर्च 1800 कोटी रुपये आहे यामध्ये संपूर्ण परिसरातील कामांचा समावेश आहे.
25 नोव्हेंबरच्या खास कार्यक्रमाला 8 ते 10 हजार अतिथींना आमंत्रण होते.
भव्य मंदिर, पूर्ण झालेला परकोटा, ध्वजदंड, आणि लाखो भक्तांमुळे राम नगरी आज पुन्हा नव्या इतिहासाची साक्षीदार झाली.