पुढारी वृत्तसेवा
गोळीच्या मध्यभागी असलेल्या रेषेला स्कोअर लाईन (Score Line) किंवा स्कोरिंग मार्क असे म्हणतात.
काही गोळ्या आवश्यकतेनुसार अर्ध्या किंवा समान भागांमध्ये विभागता याव्यात म्हणून ही रेषा दिली जाते.
डॉक्टरांनी अर्धी गोळी घेण्याचा सल्ला दिल्यास स्कोअर लाईनमुळे गोळी समान भागांत तोडणे सोपे होते.
नाही. सर्व गोळ्यांवरील रेषा गोळी तोडण्यासाठीच असते असे नाही. काही वेळा ती फक्त उत्पादन प्रक्रियेचा भाग असू शकते.
सस्टेन्ड-रिलीज (SR), एक्स्टेंडेड-रिलीज (ER), कंट्रोल्ड-रिलीज (CR) किंवा एंटेरिक-कोटेड गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तोडू नयेत.
काही औषधांमध्ये गोळी तोडल्यास औषध शरीरात चुकीच्या पद्धतीने शोषले जाऊ शकते आणि परिणाम बदलू शकतो.
गोळी अर्धी करायची की नाही, याबाबतची माहिती औषधाच्या पत्रकात किंवा पॅकेजिंगवर दिलेली असते.
गोळी तोडण्याबाबत शंका असल्यास स्वतः निर्णय घेण्याऐवजी डॉक्टर किंवा फार्मासिस्टला विचारा.
योग्य डोस आणि योग्य पद्धतीने औषध घेणे उपचारांच्या परिणामकारकतेसाठी अत्यंत आवश्यक असते.