अंजली राऊत
फोर्ब्सच्या मते, भारतातील Digital Arrest Scam हे ग्राहकांना आर्थिक नुकसान पोहोचवण्यासाठी बनावट अधिकारांचा वापर करतात.
पोलिस किंवा अधिकाऱ्यांची नक्कल केली जाते, भीती आणि गरजा निर्माण करण्यासाठी मनी लॉड्रिंगसारख्या गुन्ह्यांमध्ये ग्राहकवर्ग सहभागी असल्याचे भासवले जाते
बनावट कॉल, बनावट आयडी आणि कागदपत्रांचा वापर करून UPI किंवा क्रिप्टोद्वारे दंड आकारण्यासाठी पैसे मागितले जातात.
इमोशनल ब्लॅकमेल, सायबर सुरक्षा, डिजिटल पेमेंट आणि इतर मर्यादा ओलांडून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते
इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) देशभरात विकसित होणाऱ्या फसवणुकीच्या युक्त्यांचा सामना करण्यासाठी प्रयत्नरत राहून समन्वय साधते.
राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (NCRP) आणि हेल्पलाइन 1930 द्वारे जलद अहवाल देणे आणि फसवणूक प्रतिबंधक मदत करते.
फेब्रुवारी 2025 पर्यंत सरकारने Digital Arrest Scam मध्ये वापरलेले 83, 000 हून अधिक व्हॉट्सॲप अकाउंट्स आणि 7.8 लाख सिम ब्लॉक केले .
सायबर मित्र सारख्या जागरूकता मोहिमा नागरिकांना फसवणुकीच्या युक्त्या प्रभावीपणे ओळखण्याबद्दल आणि त्या टाळण्याबद्दल सजग करतात.
सुरक्षित राहण्यासाठी, कधीही OTP किंवा वैयक्तिक तपशील शेअर करू नका; पडताळणी करा आणि संशय आल्यास त्वरित तक्रार करा.
धमक्यांना घाबरू नका, विश्वसनीय असलेल्यांचा सल्ला घ्या आणि घाबरून जाणाऱ्या स्कॅमर्सना रोखण्यासाठी अधिकृत माध्यमांचा वापर करा.