अंजली राऊत
बीटरुटपासून बनवलेला लिप बाम तुमचे कोमल ओठ मऊ, चमकदार आणि गुलाबी बनवून नैसर्गिक रंग देतो.
साहित्य: एक मध्यम आकाराचे बीटरूट, नारळ तेल - 2 चमचे, व्हॅसलीन - 1 चमचा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल - 2 किंवा 3, एक स्वच्छ वाटी, चमचा, गाळणी आणि कंटेनर
बीट चांगले धुवून सोलून नंतर किसून घ्या आणि चाळणीने किंवा पातळ सुती कापडाने रस काढा. रस काढण्यासाठी तुम्ही त्यांना ब्लेंडरमध्ये बारीक देखील करू शकता. फक्त 2 चमचे रस पुरेसा आहे.
आता, एका भांड्यात नारळाचे तेल घाला. त्यामुळे ओठांना मॉइश्चरायझ होऊन भेगा पडण्यापासून रोखते. त्यानंतर त्याच भांड्यात व्हॅसलीन घाला. व्हॅसलीन एक संरक्षक असा थर तयार करतो जो ओठांना ओलावा देतो.
आता व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल ॲड करा त्यामुळे त्वचेला पोषण मिळून ओठ मऊ होतात. आता हे सर्व मिक्स करा. बीटरूटचा रस विरघळेपर्यंत हळूहळू मिसळत रहा, त्यानंतर एक गुळगुळीत मिश्रण तयार होईल. त्याला थोडासा वेळ लागतो.
तयार केलेले मिश्रण एका लहान, स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ओता. मिश्रण लवकर खराब होऊ नये म्हणून हे डबे उकळून पूर्णपणे वाळवून घ्या. त्यानंतर कंटेनर 4-5 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. त्यामुळे लिप बाम थोडा घट्ट होईल आणि आता हे वापरा
झोपण्यापूर्वी, ओल्या कापडाने किंवा मऊ ब्रशने तुमचे ओठ हळूवारपणे स्वच्छ करा. त्यानंतर, तयार केलेला लिप बाम बोटावर घेऊन ओठांना लावा. तसेच दिवसातून एकदा तरी लावा.
जर ओठ खूपच फाटलेले असतील तर चुकूनही क्लिंजिंग करु नका. फक्त आणि फक्त लिप बाम लावा त्यामुळे तुम्हाला दोन ते तीन दिवसांत फरक जाणवेल