केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? दिवसातून किती केळी खाणं शरीरासाठी फायदेशीर?

पुढारी वृत्तसेवा

केळं कधी खावं?

सकाळी, व्यायामापूर्वी की रात्री? जाणून घ्या केळं खाण्याची योग्य वेळ आणि दिवसातील योग्य प्रमाण.

banana | Pudhari

सकाळी केळं खाणं सर्वात फायदेशीर?

सकाळी केळं खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. मेटाबॉलिझम सक्रिय होतो आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने होते.

banana | Pudhari

वर्कआउटपूर्वी केळं खा

व्यायामाच्या 30 ते 60 मिनिटे आधी केळं खाल्ल्यास शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट्स मिळतात. यामुळे स्टॅमिना वाढतो आणि स्नायूंना ऊर्जा मिळते.

banana | Pudhari

वर्कआउटनंतरही फायदेशीर

व्यायामानंतर शरीरातील गेलेली ऊर्जा भरून काढण्यासाठी केळं उपयुक्त आहे. घामामुळे कमी झालेलं पोटॅशियमही भरून निघतं.

Banana | pudhari

संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी पर्याय

चिप्स किंवा जंक फूडऐवजी केळं खाल्ल्यास पोट भरल्यासारखं वाटतं. फायबरमुळे भूक नियंत्रणात राहते.

banana | Pudhari

रात्री केळं खाणं योग्य आहे का?

बहुतेक लोकांसाठी रात्री केळं खाणं सुरक्षित असलं तरी काहींना अपचन किंवा जडपणा जाणवू शकतो. झोपण्याच्या अगदी आधी केळ खाणं टाळा.

Banana | Pudhari

दिवसातून किती केळी खावीत?

सामान्यतः निरोगी व्यक्तीसाठी दिवसाला 1 ते 2 केळी पुरेशी मानली जातात. यामुळे पोषक घटक मिळतात आणि साखरेचं प्रमाणही नियंत्रित राहतं.

Bananas | Pudhari

जास्त व्यायाम करणाऱ्यांसाठी किती?

खेळाडू किंवा नियमित व्यायाम करणारे लोक दिवसाला 2 ते 3 केळी खाऊ शकतात. त्यामुळे ऊर्जा आणि स्नायूंची रिकव्हरी होते.

Bananas | Pudhari

जास्त केळी खाल्ल्यास काय होऊ शकतं?

दिवसाला 3 पेक्षा जास्त केळी नियमित खाल्ल्यास अतिरिक्त कॅलरीज, पोटॅशियम वाढणे, पचनाच्या तक्रारी आणि काहींमध्ये रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढू शकतो.

Banana | Pudhari

या लोकांनी घ्यावी विशेष काळजी

मधुमेह, किडनीचे आजार, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी केळ्याचं प्रमाण मर्यादित ठेवावं.

Banana | Pudhari

सफरचंद नाही, आंबाही नाही! जगात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ कोणते? उत्तर वाचून बसेल धक्का

fruits | Pudhari
येथे क्लिक करा