Rahul Shelke
पगार चांगला असतो. बिल वेळेवर भरलेले असतात. तरीही महिनाअखेरीस हातात काहीच उरत नाही.. असं तुमच्यासोबतही होतंय का?
बहुतेक वेळा अडचण कमी कमाईची नसते. पैसे कुठे खर्च करायचे, याचा फॉर्म्युला नसतो. म्हणून पैसे येतात… आणि जातात.
हा कुठलाही जादूचा मंत्र नाही. पण पैसा कसा वापरायचा यासाठीचा साधा रोडमॅप आहे.
हा नियम तुमच्या पगाराला चार भागात विभागतो.
घरभाडं, किराणा, लाईट-बिल, प्रवास, शाळेची फी, विमा… तुमचं रोजचं आयुष्य चालवण्यासाठी लागणारा खर्च. एकूण उत्पन्नाच्या 70% मध्ये हे सगळं बसायला हवं.
हा पैसा रोजच्या खर्चासाठी नाही. म्युच्युअल फंड, रिटायरमेंट फंड, SIP साठी आहे.
आजारी पडलात, अचानक प्रवास, नवं फ्रिज, फोन, दुरुस्ती... हा पैसा अशा अनपेक्षित खर्चासाठी वापरा.
होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड असेल तर त्याचे पैसे फेडा. कर्ज नसेल तर स्वतःवर खर्च करा. कोर्स, स्किल, शिक्षण, मेंटल हेल्थवर खर्च करा.
हा धोक्याचा इशारा आहे. कारण खर्च जास्त आहे किंवा उत्पन्न वाढवण्याची गरज आहे.
हा नियम तुम्हाला खरी परिस्थिती दाखवतो.
दरमहा थोडी गुंतवणूक करा त्यातून तुमचं भविष्यातील आर्थिक नियोजन चांगलं होऊ शकतं.