पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांची संपत्ती किती?

Rahul Shelke

पुण्याच्या राजकारणात मोठी हालचाल

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

‘पवारांचे कट्टर समर्थक’ अशी ओळख

प्रशांत जगताप यांची शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी म्हणून ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केलं.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

वानवडीमधून सलग तीन विजय

जगताप यांनी 2007, 2012 आणि 2017 या तीनही महापालिका निवडणुकांमध्ये वानवडी परिसरातून सलग तीन वेळा विजय मिळवला.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

महापौरपद आणि प्रशासकीय अनुभव

प्रशांत जगताप यांनी पुण्याचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. यासोबतच पीएमपीएमएल (PMPML) चे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

राष्ट्रवादीत फूट, पण शरद पवारांसोबतच

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रशांत जगताप यांनी अजित पवार गटाकडे न जाता शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं. त्यांनी पुणे शहराध्यक्ष म्हणूनही पक्षाची धुरा सांभाळली.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

2024 ची विधानसभा निवडणूक

2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हडपसर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

प्रशांत जगताप यांची एकूण संपत्ती

2024 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार प्रशांत जगताप यांनी सुमारे 5.44 कोटींची एकूण संपत्ती जाहीर केली आहे.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

देणी किती?

जगताप यांच्यावर सुमारे 31.54 लाखांचे कर्ज असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. कर्ज वजा केल्यास त्यांची एकूण नेटवर्थ अंदाजे 5.12 कोटी इतकी आहे.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

काँग्रेससाठी फायदेशीर

प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे विशेषतः हडपसर आणि पुणे शहरात काँग्रेसला मोठं बळ मिळू शकतं.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

पवार गटासाठी मोठा धक्का

प्रशांत जगताप यांनी पक्ष बदल्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Prashant Jagtap Net Worth | Pudhari

सकाळी पोट साफ होत नाही? मग हे ४ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

stomach | Pudhari
येथे क्लिक करा