Rainbow Cloud: मोठ्या नैसर्गिक बदलाचे संकेत.. Cloud Iridescence म्हणजे काय?

Anirudha Sankpal

अलीकडेच १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आकाशात आकर्षक 'रेनबो क्लाउड्स' दिसल्याची विलोभनीय घटना घडली आहे.

यापूर्वी अशा प्रकारचे दुर्मिळ ढग २०२४ मध्ये चीन आणि २०२२ मध्ये दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये दिसले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

विज्ञानाच्या भाषेत या नैसर्गिक घटनेला 'क्लाउड इरिडेसन्स' (Cloud Iridescence) असे म्हणतात.

जेव्हा ढगांमध्ये पाण्याचे अतिशय सूक्ष्म थेंब किंवा बर्फाचे स्फटिक असतात आणि त्यातून सूर्याचा प्रकाश विशिष्ट कोनातून जातो, तेव्हा प्रकाशाचे विखुरण (Diffraction) होऊन हे रंग दिसतात.

हे ढग सहसा 'पायलिअस' (Pileus) प्रकारच्या ढगांच्या वर तयार होतात, जे वेगाने वर जाणाऱ्या हवेमुळे बनलेले असतात.

शास्त्रीय दृष्ट्या ही घटना साबणाच्या फुग्यावर किंवा तेलाच्या थरावर दिसणाऱ्या रंगांप्रमाणेच प्रकाश परावर्तित झाल्यामुळे घडते.

अनेक संस्कृतींमध्ये या ढगांबाबत काही अंधश्रद्धा असून, जुन्या काळात लोक याला 'देवाचा संदेश' किंवा मोठ्या नैसर्गिक बदलाचे संकेत मानत असत.

काही अख्यायिकांनुसार, इंद्रधनुषी ढग दिसणे हे नशिबाचे प्रतीक मानले जाते, तर काहींना वाटते की हे परग्रहावरील विमानांचे (UFO) लक्षण आहे.

प्रत्यक्षात मात्र, ही कोणत्याही दैवी शक्तीचा चमत्कार नसून केवळ वातावरणातील प्रकाशाचा एक सुंदर आणि दुर्मिळ खेळ आहे.

येथे क्लिक करा