अचानक भीती वाटतेय? शरीर देतंय 'हे' संकेत; पॅनिक अटॅक तर नाही ना?

पुढारी वृत्तसेवा

पॅनिक अटॅक म्हणजे काय?

कोणताही धोका नसताना अचानक प्रचंड भीती वाटू लागते. या स्थितीला पॅनिक अटॅक म्हणतात.

अचानक घाबरल्यासारखे वाटणे

मनात अचानक भीती निर्माण होते आणि काहीतरी वाईट घडणार असल्याची भावना निर्माण होते. काही जणांना तर आपला जीव जाणार असल्यासारखेही वाटू लागते.

श्वास घेण्यास त्रास होणे

पॅनिक अटॅकच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. कधी श्वास वेगाने वाढतो, तर कधी गुदमरल्यासारखे वाटते.

शरीराला फुटतो घाम, हातपाय थरथरतात

अचानक घाम येणे, हातपाय थरथरणे आणि अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसतात. काही जणांना छातीवर दडपण आल्यासारखेही जाणवते.

पॅनिक अटॅक येण्याची कारणे काय?

तीव्र मानसिक ताण, एखादा वाईट अनुभव किंवा आयुष्यातील मोठे बदल यामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो. जास्त कॅफीनचे सेवन, बालपणीचे कटू अनुभव आणि अनुवंशिकताही कारणीभूत ठरू शकते.

शरीरात नेमकं काय घडतं?

मेंदूतील सेरोटोनिन, नॉरपेनेफ्रिन आणि GABA या रसायनांच्या कार्यातील बदलांचा पॅनिक अटॅकशी संबंध असू शकतो.

पॅनिक अटॅक किती वेळ राहतो?

पॅनिक अटॅकची लक्षणे अचानक सुरू होतात आणि काही मिनिटांत तीव्र होतात. साधारणपणे १० ते १५ मिनिटांत त्यांचा जोर कमी होऊ शकतो.

पॅनिक अटॅक आल्यास काय करावे?

शांत ठिकाणी बसा आणि नाकाने हळूहळू श्वास घेण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावर थंड पाण्याचे शिंतोडे मारा आणि जवळच्या व्यक्तीची मदत घ्या.

डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे का?

अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हृदयाशी संबंधित त्रास नाही ना, हे तपासणेही महत्त्वाचे आहे. गरजेनुसार औषधे, समुपदेशन आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे उपचार केले जातात.

पॅनिक अटॅक जीवघेणा असतो का?

पॅनिक अटॅक स्वतःहून सहसा जीवघेणा नसतो; मात्र वारंवार होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घेतल्यास भीतीवर नियंत्रण मिळवता येते.

Kulhad tea benefits | चहा पिण्याची मज्जा दुप्पट! मातीच्या ‘कुल्हड’मधील चहाचे जबरदस्त फायदे

येथे क्लिक करा