स्वालिया न. शिकलगार
चहाची चव द्विगुणीत करणारा हा पारंपरिक अंदाज आरोग्यासाठीही आहे फायदेशीर.
कुल्हडमध्ये चहा उकळल्यामुळे, ओतल्यामुळे त्यात मातीचा नैसर्गिक सुगंध मिसळतो.
प्लॅस्टिक, कागदी कप्समध्ये केमिकल्स, मेण चहामध्ये मिसळण्याची भीती असते
मातीपासून बनवलेले कुल्हड पूर्णपणे नैसर्गिक, विषमुक्त असतात.
मातीमध्ये नॅचरल अल्कलाईन (Alkaline) गुणधर्म असतात
कुल्हडमधील मातीचे गुणधर्म चहामधील अम्लता (Acidity) संतुलित करण्यास मदत करतात
यामुळे चहा पिल्यानंतर अनेकांना होणाऱ्या ॲसिडिटीचा त्रास कमी होतो, पचनक्रिया सुधारते.
मातीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस यांसारखी अनेक महत्त्वाची खनिजे असतात
जेव्हा गरम चहा कुल्हडच्या संपर्कात येतो, तेव्हा यातील काही पौष्टिक घटक शरीरात जातात
कुल्हड हे पूर्णपणे बायोडिग्रेडेबल असतात. वापरल्यानंतर ते मातीत सहज मिसळतात