पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात पाणी कमी पिण्याची सवय अनेकांना असते. डिहायड्रेशनकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम धोकादायक होऊ शकतात.
शरीरातून घाम, लघवी किंवा जुलाबामुळे पाणी जास्त प्रमाणात कमी होतं. पण त्याची भरपाई वेळेवर झाली नाही, तर शरीर अलर्ट देतं.
खूप तहान लागणे हे पहिलं मोठं लक्षण आहे. तोंड कोरडं पडतं. ओठ सुकतात.
पाणी कमी झालं की मेंदूकडे रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे डोकेदुखी, चक्कर आणि अस्वस्थपणा जाणवतो.
लघवीचं प्रमाण कमी होतं. रंग गडद पिवळा किंवा तपकिरी दिसू शकतो. हे शरीर देत असलेले गंभीर संकेत असतात.
ऊर्जा कमी वाटते. कामात लक्ष लागत नाही. शरीर जड झाल्यासारखं वाटतं.
त्वचा कोरडी पडते. तजेलदारपणा कमी होतो. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसतो.
पाणी कमी झाल्याने रक्ताभिसरण मंदावते. रक्तदाब घसरतो. हृदयाचे ठोके वाढू शकतात.
गोंधळ उडणे (Confusion) शुद्ध हरपणे मूत्रपिंडाच्या समस्या किंवा किडनी स्टोनचा धोका निर्माण होऊ शकतो.
नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा ORS घ्या. लक्षणे गंभीर असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.