इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनेई किती श्रीमंत होते? कसे कमावले पैसे?

पुढारी वृत्तसेवा

खामेनेईंच्या संपत्तीची चर्चा

अमेरिका-इस्रायल हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अयातुल्ला अली खामेनेई यांच्या संपत्तीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. ते १९८९ पासून इराणचे सर्वोच्च नेते होते.

Ayatollah Khamenei Net Worth | Pudhari

किती होती संपत्ती?

२०१३ मध्ये रॉयटर्सच्या अहवालात दावा करण्यात आला होता की, खामेनेई सुमारे ९५ अब्ज डॉलरच्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवतात. ही रक्कम थेट त्यांच्या नावावर नसून संस्थेच्या नावावर होती.

Ayatollah Khamenei Net Worth | Pudhari

ही रक्कम किती मोठी?

९५ अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत अंदाजे ८ लाख कोटी रुपये. नंतरच्या काही अहवालांत ही रक्कम २०० अब्ज डॉलरपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला.

Ayatollah Khamenei Net Worth | Pudhari

'सेताद' म्हणजे काय?

खामेनेईंच्या आर्थिक नियंत्रणाचा मुख्य स्रोत ‘सेताद’ ही संस्था मानली जाते. १९७९ च्या इराणी क्रांतीनंतर जप्त मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी ती स्थापन झाली.

Ayatollah Khamenei Net Worth | Pudhari

कोणकोणत्या क्षेत्रांत गुंतवणूक?

सेतादची रिअल इस्टेट, तेल-ऊर्जा, बँकिंग, शेअर्स, दूरसंचार आणि उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांवर प्रभाव असल्याचे म्हटले जाते.

Ayatollah Khamenei Net Worth | Pudhari

खामेनेईची वैयक्तिक संपत्ती नाही

खामेनेई स्वतः साधे जीवन जगत होते, असा दावा त्यांच्या समर्थकांचा होता. ते स्वतःकडे वैयक्तिक संपत्ती नसल्याचे सांगत. मात्र टीकाकारांचे मत होते की नियंत्रण त्यांच्या कार्यालयाकडे होते.

Ayatollah Khamenei Net Worth | Pudhari

नियंत्रण आणि मालकी यात फरक काय?

संपत्ती थेट नावावर नसली, तरी संस्थेवर नियंत्रण असल्यास निर्णयक्षमता मोठी असते.

Ayatollah Khamenei Net Worth | Pudhari

पारदर्शकतेचा प्रश्न

सेतादची आर्थिक माहिती सार्वजनिकरित्या पूर्णपणे उपलब्ध नसल्याचे म्हटले जाते. इराणमध्ये सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयाची माहिती मर्यादित असते.

Ayatollah Khamenei Net Worth | Pudhari

राजकीय आणि आर्थिक प्रभाव

जर एखाद्या संस्थेकडे देशातील महत्त्वाच्या उद्योगांवर नियंत्रण असेल, तर त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो.

Ayatollah Khamenei Net Worth | Pudhari

उन्हाळ्यात कैरीचं पन्हं पिल्यावर शरीरात काय बदल होतात?

Kairiche Panhe | Pudhari
येथे क्लिक करा