रोज सकाळी बटाट्याचा पराठा खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Rahul Shelke

सकाळी नाश्त्याला बटाट्याचा पराठा खाताय?

खुसखुशीत, गरमागरम बटाट्याचा पराठा म्हणजे अनेकांसाठी दिवसाची परफेक्ट सुरुवात.
पण रोज खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो?

Aloo Paratha | Pudhari

लगेच काय होतं?

बटाट्याच्या पराठ्यात कर्बोदकं (Carbohydrates) जास्त असतात. खाल्ल्यानंतर शरीराला पटकन ऊर्जा मिळते आणि काही वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.

Aloo Paratha | Pudhari

ब्लड शुगरवर परिणाम

पराठा खाल्ल्यावर रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा धोका ठरू शकतो.

Aloo Paratha | Pudhari

रोज खाल्ल्यास काय?

रोज पराठा खाल्ल्यास लठ्ठपणा, टाईप-2 डायबिटीज आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Aloo Paratha | Pudhari

बसून काम करणाऱ्यांसाठी इशारा

ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांचं शरीर ही ऊर्जा वापरू शकत नाही. अतिरिक्त कॅलरीज थेट चरबीच्या स्वरूपात साठतात.

Aloo Paratha | Pudhari

थकवा का येतो?

सकाळी पराठा खाल्ल्यावर काही तासांनी थकवा, सुस्ती किंवा पुन्हा भूक लागू शकते.

Aloo Paratha | Pudhari

सोबत काय खाताय हे महत्त्वाचं?

दह्यामुळे प्रोटीन मिळतं, भाज्यांमुळे फायबर वाढतं. यामुळे पचन हळूहळू होतं आणि साखर नियंत्रणात राहते.

Aloo Paratha | Pudhari

काय टाळावं?

जास्त तूप/लोणी घातल्यास कॅलरीज आणि चरबी वाढते. यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.

Aloo Paratha | Pudhari

कोणी काळजी घ्यावी?

या लोकांनी रोज पराठा खाणे टाळावे - मधुमेह असलेले, हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉल असलेले, पचनाच्या तक्रारी असलेले

Aloo Paratha | Pudhari

आलू पराठा वाईट नाही, पण

आठवड्यात 1–2 वेळा, कमी तेलात बनवलेला पराठा चालतो. दही, सलाड, भाज्यांसोबत खाल्ल्यास तो आरोग्यदायी ठरू शकतो.

Aloo Paratha | Pudhari

झोपण्याआधी मुलांना 'हे' 6 प्रश्न नक्की विचारा

Parenting Coach | Pudhari
येथे क्लिक करा