झोपण्याआधी मुलाला हे 6 प्रश्न नक्की विचारा

पुढारी वृत्तसेवा

पालकांची छोटी सवय

आई-वडिलांचे शब्द मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करतात. रोज 5–10 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली तर चांगला परिणाम होतो.

Parenting Coach | Pudhari

झोपण्याआधीचा वेळ खास असतो

झोपण्याआधी मुलाचं मन शांत असतं. तो दिवसभराच्या गोष्टी मोकळेपणाने सांगतो. हा संवादासाठी सर्वोत्तम काळ असतो.

Parenting Coach | Pudhari

आज तुला सर्वात जास्त आनंद कशाचा झाला?

यामुळे मुलं छोट्या-छोट्या आनंदाची किंमत ओळखायला शिकतात. आणि सकारात्मक विचार वाढतो.

Parenting Coach | Pudhari

आज काही अडचण आली का? ती तू कशी सोडवलीस?

मुलांना कळतं की अडचणी येणं चुकीचं नाही. तर त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे.

Parenting Coach | Pudhari

आज तू कुणाची मदत केलीस किंवा कुणी तुझी मदत केली का?

हा प्रश्न दयाळूपणा, सहानुभूती आणि कृतज्ञता शिकवतो

Parenting Coach | Pudhari

आज तुला काय आवडलं नाही?

मुलांना त्यांच्या नकारात्मक भावना दडपून न ठेवता मोकळेपणाने सांगता येतात.

Parenting Coach | Pudhari

आज तुला कशामुळे स्वतःचा अभिमान वाटला?

यामुळे मुलांचा आत्मसन्मान वाढतो आणि स्वतःवर विश्वास बसतो.

Parenting Coach | Pudhari

उद्यासाठी तुझा काय प्लॅन आहे?

मुलांमध्ये नियोजनाची सवय लागते आणि जबाबदारीची जाणीव होते.

Parenting Coach | Pudhari

हे 6 प्रश्न रोज विचारा

हे 6 प्रश्न रोज विचारा… मुलं भावनिकदृष्ट्या मजबूत होतील आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

Parenting Coach | Pudhari

झोपेत असताना तोंडातून लाळ का येते?

Sleep Drooling | Pudhari
येथे क्लिक करा