सलग ३० दिवस साखर न घेतल्याने शरीर आणि मनावर लक्षणीय बदल दिसून येतात, पण सुरुवातीला ही प्रक्रिया त्रासदायक ठरते.साखर बंद केल्यावर सुरुवातीच्या काही दिवसांत चिडचिडेपणा, थकवा, चिंता किंवा नैराश्य जाणवू शकते .मेंदूला साखरेमुळे मिळणारा डोपामिनचा ‘हिट’ मिळेनासा होतो, त्यामुळे थकवा, डोकेदुखी सुरू होते.साखर न घेतल्याने दुसऱ्या आठवड्यापासून रक्तातील साखरेची पातळी स्थिर होण्यास सुरूवात होते.साखर टाळल्याने तिसऱ्या आठवड्यापासून त्वचा सुधारून पुरळ कमी होतात, सूज आणि दाह कमी होऊन चेहऱ्याची त्वचा अधिक स्वच्छ व उजळ दिसते.मानसिक आरोग्य सुधारते, लक्ष केंद्रित होते, स्थिरता आणि ताजेपणा वाढतो. ३० दिवस साखर टाळल्यास शरीर अधिक निरोगी, त्वचा स्वच्छ, मन स्थिर आणि वजन नियंत्रित राहते .वजन घटते, कॅलरीचे प्रमाण कमी होते, इन्सुलिन पातळी स्थिर राहते.उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो.येथे क्लिक करा