वयाच्या ३५ व्या वर्षी तमन्ना भाटियाचे सौंदर्य आणि ऊर्जा काही कमी झालेले नाही . तमन्नाची त्वचा खूप तजेलदार आहे. तसेच ती खूप तंदुरुस्त आहे .तमन्ना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झोपतून उठते आणि ४.३० वाजता जीमला जाते.पहाटे उठल्यानंतर ती पुन्हा दिवसा अजिबात झोपत नाही, संपूर्ण दिवसभर काम करते.डाएटवर नियंत्रण ठेवणे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. वर्कआऊट महत्त्वाचा आहे .तिचे मते सूर्योदयापूर्वी दिवसाची सुरुवात केल्याने एक वेगळाच आनंद मिळतो .पहाटे व्यायाम केल्यामुळे कामात लक्ष केंद्रित होण्यास मदत होते, ऊर्जा मिळते आणि रात्री चांगली झोप येते .रात्री पुरेशी सात ते नऊ तास झोप घेतल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.तंदुरूस्त राहण्यासाठी शिस्तबद्ध दिनचर्या आणि व्यायामाला दुसरा कोणताही पर्याय नाही .येथे क्लिक करा