अविनाश सुतार
दीर्घकाळ उपाशी राहिल्यास कमी रक्तदाब, साखर अचानक कमी होणे, बेशुद्ध पडणे यासारखे गंभीर त्रास होऊ शकतात
भूक लागली की शरीर अन्नाच्या अपेक्षेने अॅसिड तयार करते. जेवण न मिळाल्यास छातीत जळजळ, अॅसिडिटी, पोटदुखी सुरू होते
रक्तातील साखर कमी झाल्याने सेरोटोनिन आणि इतर मेंदूचे केमिकल्स कमी होतात.परिणाम चिडचिड वाढणे, लक्ष केंद्रित न होणे, तणाव जाणवणे, कामगिरी कमी होणे
जेवण वेळेवर न केल्यास शरीर प्रथम stored glucose वापरते. यानंतर ऊर्जा मिळवण्यासाठी चरबी (Fat) घेण्यास सुरूवात होते दीर्घकाळ उपाशी राहिल्यास स्नायू (Muscle) देखील कमी होऊ लागतात
भूक लागलेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होऊन ताणतणाव वाढून चिडचिडेपणा वाढतो
वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते, वजन वाढते, फॅट्स शरीरात जमा होतात
भूक लागल्यानंतर न जेवल्यास रक्तातील ग्लुकोज कमी होऊ लागते. यामुळे चक्कर येणे, हातपाय थरथरणे, कमजोरी जाणवणे, बेचैनी वाढणे असे प्रकार होतात
ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यास मेंदूचे कार्य विस्कळीत होते. वेळेत जेवण न केल्यास रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते
भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदू सुस्त होऊन मूड स्विंग होतो