Anirudha Sankpal
अनावश्यक वीज वापर
चार्जिंग पूर्ण झाल्यावरही चार्जर सॉकेटमध्ये राहिल्यास फोन जोडलेला नसतानाही ०.१ ते ०.५ वॅटपर्यंत वीज वापर सुरू राहतो.
ओव्हरहिटिंग आणि शॉर्ट-सर्किट
बनावट किंवा खराब चार्जर जास्त वेळ सॉकेटमध्ये राहिल्यास तो गरम होतो आणि विजेच्या चढ-उतारामुळे शॉर्ट-सर्किटचा धोका असतो.
चार्जरचे आयुष्य
सॉकेटमध्ये सतत चार्जर लावून ठेवल्याने त्यातील अंतर्गत इलेक्ट्रॉनिक घटकांचे नुकसान होऊन चार्जरचे आयुष्य कमी होते.
स्मार्ट चार्जिंग तंत्रज्ञान
आधुनिक स्मार्टफोन्समध्ये १००% चार्जिंग झाल्यावर चार्जिंग आपोआप बंद होते, त्यामुळे बॅटरी लगेच खराब होत नाही.
दीर्घकालीन बॅटरीचे आरोग्य
फोन वारंवार किंवा खूप वेळ १००% चार्जिंगवर ठेवणे योग्य नाही; बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी ती २०% ते ८०% दरम्यान ठेवणे सर्वात योग्य मानले जाते.
रात्रीभर चार्जिंग टाळा
सुरक्षिततेसाठी आणि बॅटरीच्या चांगल्या आरोग्यासाठी रात्री झोपताना फोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवणे टाळा.
ओरिजनल चार्जर वापरा
सुरक्षित वापरासाठी नेहमी कंपनीचा अधिकृत, प्रमाणित चार्जर आणि चांगल्या गुणवत्तेची केबलच वापरा.
उत्तम सवय
चार्जिग पूर्ण झाल्यावर सॉकेटमधून चार्जर लगेच बाहेर काढण्याची सवय ठेवा, ज्यामुळे विजेची बचत आणि सुरक्षितता दोन्ही राहते.