Diabetes & Roti: मधुमेह आहे म्हणून चपाती बंद न करता फक्त क्रम बदला... होईल फायदा

Anirudha Sankpal

चपाती पूर्ण बंद करू नका

मधुमेह झाला म्हणून चपाती किंवा भात पूर्ण बंद करण्याची गरज नाही, फक्त प्रमाण कमी करून खाण्याची पद्धत बदला.

ताटाची योग्य रचना

ताटाचा अर्धा भाग भाजी आणि कोशिंबीर, पाव भाग प्रोटीन (डाळ, उसळ, पनीर) आणि उरलेला पाव भाग चपाती किंवा भातासाठी ठेवा.

क्रम बदला

जेवणाची सुरुवात कोशिंबीर किंवा भाजीने करा, त्यानंतर डाळ-उसळ (प्रोटीन) घ्या आणि चपाती-भात शेवटी खा.

प्रोटीन फायबर वाढवा

जेवणात फायबर (भाज्या) आणि प्रोटीनचे प्रमाण वाढवून कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी केल्याने रक्तातील साखरेची पातळी (Sugar) नियंत्रणात राहते.

Protein Supplements In Veg Food | Pinterest Photo

नेमकं काय बदलायचं?

ताटात ३-४ चपात्यांऐवजी १ ते २ चपात्या, थोड्या भाजीऐवजी भरपूर भाजी आणि वरण ऐवजी वाटीभर डाळ किंवा उसळ खा.

Drinking Tea After Meals | pudhari

गोड पदार्थ कधी खावे

जेवणानंतर लगेच गोड खाण्याची सवय टाळा आणि गोड पदार्थांपासून दूर राहा.

Sweet Dish In Ayurveda | pudhari

आधी कोशिंबीर

आज रात्रीच्या जेवणाआधी काकडी, टोमॅटो, गाजर आणि लिंबू घातलेली एक वाटी कोशिंबीर खाऊन मग नेहमीचे जेवण सुरू करा.

जेवणानंतर १० मिनिटे चाला

जेवणानंतर रोज १० मिनिटे शांतपणे चालल्यास साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास दुहेरी फायदा होतो.

Backward Walking Benefits
येथे क्लिक करा