रोज मटण खाल्ले तर शरीरात काय बदल होतात?

पुढारी वृत्तसेवा

रोज मटण खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. त्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते.

Mutton | Pudhari

मटणामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होते आणि थकवा कमी जाणवतो.

Mutton | Pudhari

पण रोज मटण खाण्यामुळे सॅच्युरेटेड फॅट वाढू लागते आणि त्याचा थेट परिणाम कोलेस्ट्रॉलवर होतो.

Mutton | Pudhari

यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

Mutton | Pudhari

मटण हे कॅलरीने समृद्ध अन्न असल्यामुळे रोज खाल्ल्यास वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता असते.

Mutton | Pudhari

मटण पचायला जड असल्यामुळे पचनाच्या समस्या जसे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता वाढू शकते.

Mutton | Pudhari

जास्त प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्याने किडनीवर ताण येऊ शकतो, तसेच यकृताच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो.

Mutton | Pudhari

तज्ज्ञांच्या मते, मटण रोज खाण्यापेक्षा आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Mutton | Pudhari

म्हणूनच संतुलित आहार ठेवणे गरजेचे आहे. चिकन किंवा मासे यांसारखे पर्याय निवडले, तर आरोग्य अधिक चांगले राहू शकते.

Mutton | Pudhari

मराठी, हिंदी, इंग्रजी नाही तर 'या' भाषेत लिहिलं होतं डॉ. आंबेडकरांचं पहिलं चरित्र

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari
येथे क्लिक करा