पुढारी वृत्तसेवा
28 ऑगस्ट 1940 हा दिवस इतिहासात कोरला गेला. याच दिवशी बाबासाहेबांचं पहिलं चरित्र प्रकाशित झालं.
विशेष म्हणजे हे चरित्र मराठीत नाही, तर गुजराती भाषेत लिहिलं गेलं होतं.
या पुस्तकाचं नाव होतं “जीवन चरित्र : डॉ. बी. आर. आंबेडकर, एस्क्वायर”
हे चरित्र लिहिलं होतं लेखक यू. एम. सोलंकी यांनी.
या पुस्तकात 1940 पर्यंतच्या बाबासाहेबांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला गेला.
त्यांच्या सामाजिक चळवळी, संघर्ष आणि लोकांमध्ये असलेली लोकप्रियता यात मांडली गेली.
या चरित्राची कल्पना 1933 मध्ये सुचली. कारण गुजरातमध्ये बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नव्हती.
आर्थिक अडचणींमुळे प्रकाशन अडकलं होतं. पण काही जणांनी पुढे येत मदत केली आणि पुस्तक प्रकाशित झालं.
हे फक्त पुस्तक नव्हतं. तर बाबासाहेबांच्या विचारांचा पहिला दस्तऐवज होता. म्हणूनच त्याची किंमत ‘अमूल्य’ होती.