अविनाश सुतार
अंडी ही प्रथिनांचा प्रमुख स्रोत असून जीवनसत्त्वे, खनिजे आणि मेद (फॅट्स) मुबलक प्रमाणात असतात
अंड्यांमध्ये स्नायूंची निर्मिती व दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व नऊ अत्यावश्यक अमिनो आम्ले असतात
अंडी ही जीवनसत्त्व B12, मेंदूची कार्यक्षमता वाढवणारे कोलीन आणि डोळ्यांसाठी उपयुक्त ल्युटीन यांचे उत्तम स्रोत आहेत
एका अंड्यात सुमारे १८६ मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असते. १२ अंडी खाल्ल्यास जास्त कोलेस्टेरॉल शरीरात जाते
अंडी जर लोणी किंवा तेलात डीप फ्राय केली तर LDL (‘वाईट’) कोलेस्टेरॉल आणखी वाढू शकते
अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अति सेवन केल्यास मूत्रपिंडांसाठीही हानिकारक ठरू शकते
अंडी जास्त खाल्ल्यास काही लोकांना पोट फुगणे किंवा अपचनासारखी लक्षणे जाणवू शकतात
अंडी अतिशय पौष्टिक असली तरी दररोज १२ अंडी खाणे हे आरोग्यास अपायकारक ठरू शकते
अंड्यांचे सेवन अधिक केल्यास विशेषतः कोलेस्टेरॉल वाढणे आणि हृदयाशी संबंधित आरोग्याच्या समस्या वाढू शकतात