पुढारी वृत्तसेवा
दररोज बीटचा २५० ते ५०० मिली रस घेतल्यास शारीरिक कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होते
खेळाडूंनी एका आठवड्यासाठी दररोज ५०० मिली रस घेतल्यास कार्यक्षमतेत सुमारे ३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे
बीटचा रस पाणी किंवा सफरचंदाच्या रसात मिसळून घेता येईल,
जास्तीत जास्त नायट्रेट्स मिळण्यासाठी रस ताजा घेतल्यास फायदा होतो
व्यायामाच्या २ ते ३ तास आधी बीटचा रस घेतल्यास चांगले परिणाम दिसून येतात
मूत्रपिंडात खडे होण्याची प्रवृत्ती असलेल्या लोकांनी बीटचा रस घेतना अधिक काळजी घेण्याची गरज आहे
रक्तदाबावरील औषधे घेणाऱ्या आणि रक्तदाब कमी करणारी औषधे घेणाऱ्या लोकांनी या रसाचे सेवन कमी प्रमाणात घ्यावे
बिटाच्या रसामध्ये चव आणि वैविध्य आणण्यासाठी लिंबू किंवा गाजराचा रस मिक्स करू शकता
संतुलित आहाराचा भाग म्हणून बीटाचा रस घेतल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात