Rahul Shelke
ऊसाच्या रसात नैसर्गिक साखर (सुक्रोज) भरपूर असते. म्हणून शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि थकवा लगेच कमी होतो.
यामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराची इम्युनिटी मजबूत करतात आणि आजारांपासून संरक्षण करतात.
रसातील पोटॅशियम पोटातील pH संतुलित ठेवतो. त्यामुळे अपचन, गॅस आणि आम्लपित्त कमी होण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार ऊसाचा रस यकृत मजबूत करतो. कावीळमध्ये फायदेशीर ठरतो आणि किडनी स्वच्छ ठेवायला मदत करतो.
ऊसाच्या रसात अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड्स असतात. मुरुम कमी होतात, त्वचा तजेलदार दिसते आणि नैसर्गिक ग्लो मिळतो.
ऊसाच्या रसात कॅलरीज आणि साखर जास्त असते. रोज मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका असतो.
डायबिटीस असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रोज रस पिऊ नये. लठ्ठपणा किंवा डायबिटीस असल्यास विशेष काळजी घ्या.
उघड्यावर किंवा अस्वच्छ ठिकाणी रस पिल्यास जुलाब, उलटी, पोटदुखी होऊ शकते.
रस काढल्यानंतर 15–20 मिनिटांत पिणं सर्वात चांगलं.
ताज्या ऊसाच्या रसाचे मर्यादित सेवन फायदेशीर आहे. अति प्रमाणात घेतल्यास नुकसान होऊ शकतं. दिवसातून अर्धा ते एक ग्लास पुरेसा आहे.