शिवाजी महाराजांच्या कुटुंबात कोण कोण होतं? तुम्हाला माहितेय का?

Rahul Shelke

स्वराज्याचे संस्थापक

शिवाजी महाराज केवळ महान योद्धा नव्हते, तर कुटुंबवत्सल राजा होते. त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू आजही अनेकांना माहित नाहीत.

Shivaji Maharaj Family | Pudhari

महाराजांचे एकूण ८ विवाह

महाराजांनी आठ विवाह केले होते – सगुणाबाई, सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई.

Shivaji Maharaj Family | Pudhari

राज्याभिषेकावेळी हयात असलेल्या राण्या

१६७४ च्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या चार राण्या हयात होत्या. त्यावेळी पट्टराणी होण्याचा मान सोयराबाईंना मिळाला.

Shivaji Maharaj Family | Pudhari

महाराजांचे पुत्र

महाराजांना दोन पुत्र होते, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. राज्याभिषेकाच्या वेळी युवराज म्हणून संभाजी महाराजांची निवड झाली.

Shivaji Maharaj Family | Pudhari

लहानपणी आईचा आधार हरपला

संभाजी महाराज अवघे अडीच वर्षांचे असतानाच त्यांच्या आई सईबाईंचे निधन झाले. हा महाराजांच्या कुटुंबासाठी मोठा आघात होता.

Shivaji Maharaj Family | Pudhari

रायगडावरील अंतर्गत तणाव

पट्टराणी सोयराबाई आणि युवराज संभाजी महाराज यांच्यातील अधिकारांमुळे रायगडावर मतभेद आणि तंटेबखेडे सुरू झाले.

Shivaji Maharaj Family | Pudhari

महाराजांच्या सहा कन्या

शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या. सर्व मुलींचे विवाह नामांकित घराण्यांत झाले, मात्र महाराजांचा एकही जावई स्वराज्याच्या लढ्यात सक्रिय सहभागी झाल्याचे आढळत नाही.

Shivaji Maharaj Family | Pudhari

आईचा आशीर्वाद आणि अखेरचा क्षण

महाराजांच्या आई जिजाबाई यांनी आपल्या मुलाचा राज्याभिषेक पाहिला. तो आनंद त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण होता.

Shivaji Maharaj Family | Pudhari

जिजाबाईंचे निधन

आपल्या मुलाला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्या माऊलीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला.

Shivaji Maharaj Family | Pudhari

स्वराज्याच्या मागे उभं होतं कुटुंब

शिवाजी महाराजांचे आयुष्य फक्त युद्धांनी नाही, तर कुटुंबातील आनंद, दुःख आणि त्यागांनीही घडले. स्वराज्याच्या पाठीमागे उभं होतं एक मोठं कुटुंब.

Shivaji Maharaj Family | Pudhari

संदर्भ पुस्तक

प्र.न. देशपांडे यांनी लिहिलेलं 'छत्रपती शिवाजी महाराज' हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Shivaji Maharaj Family | Pudhari

महाराष्ट्रात टिपू सुलतानची सत्ता कुठपर्यंत होती?

Tipu Sultan’s Rule | Pudhari
येथे क्लिक करा