Rahul Shelke
स्वराज्य उभारताना शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना सर्वोच्च महत्त्व दिलं.
शिवाजी महाराजांनी फक्त युद्ध जिंकलं नाही… तर किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं.
इतिहासातील बखरींनुसार महाराजांनी सुमारे 111 किल्ले स्वतः बांधले.
इतकंच नाही तर आधी अस्तित्वात असलेल्या 49 किल्ल्यांची डागडुजी करून ते अभेद्य बनवले.
म्हणजे एकूण 160 किल्ले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडलेले होते. हा आकडा थक्क करणारा आहे.
या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट किल्ले, सागरी किल्ले यांचा समावेश होता. महाराजांची युद्धनीती प्रत्येक लढाईसाठी वेगळी होती.
हे किल्ले आजच्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा या राज्यांमध्ये पसरलेले आहेत.
स्वराज्याची सुरुवात बारा मावळ प्रदेशातून झाली. त्या छोट्या भागातही 8 मजबूत किल्ले होते. हा परिसर लष्करी दृष्ट्या अजिंक्य होता.
महाराजांचं धोरण स्पष्ट होतं “घाट तिथे किल्ला”... हे किल्ले स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे होते.