पुढारी वृत्तसेवा
सलग 30 दिवस दारू प्यायलात तर काय होईल?
फक्त यकृतच नाही, तर मेंदू, हृदय आणि संपूर्ण शरीरावर होतो गंभीर परिणाम.
यकृतावर ताण वाढतो
सलग मद्यपान केल्यामुळे यकृतात चरबी साचू लागते. यामुळे फॅटी लिव्हर आणि पुढे सिरोसिससारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
झोप लागते... पण आराम मिळत नाही
दारूमुळे झोपेचं नैसर्गिक चक्र बिघडतं. सकाळी उठल्यानंतरही थकवा आणि आळस कायम राहू शकतो.
विचारशक्ती कमी होऊ शकते
सतत मद्यपान केल्याने एकाग्रता कमी होते. चिडचिड, मूड स्विंग्स आणि निर्णयक्षमताही कमी होते.
पोटाच्या समस्या वाढतात
अॅसिडिटी, मळमळ, अपचन आणि पोटातील जळजळ यांसारख्या तक्रारी वाढू शकतात.
डिहायड्रेशनचा धोका
दारूमुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे डोकेदुखी, कोरडी त्वचा आणि सतत थकवा जाणवू शकतो.
रक्तदाब वाढू शकतो
सलग मद्यपानामुळे रक्तदाब, हृदयाचे अनियमित ठोके आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
आजार लवकर होण्याची शक्यता
शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने संसर्ग आणि इतर आजारांचा धोका वाढतो.
चिंता आणि नैराश्य वाढू शकतं
सलग मद्यपानामुळे ताण, चिंता आणि डिप्रेशनचा धोका वाढतो
वेळीच सावध व्हा!
सलग 30 दिवस मद्यपान केल्याने शरीराच्या अनेक अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.