नदीचं पाणी गोड आणि समुद्राचं पाणी खारं का असतं? जाणून घ्या यामागचं कारण

पुढारी वृत्तसेवा

नदीचं पाणी गोड... पण समुद्राचं खारं का?

पावसापासून समुद्रापर्यंतचा हा नैसर्गिक प्रवास समजून घ्या.

नदी आणि समुद्र दोन्ही पाण्याचे स्रोत

दोन्हीही जलचक्राचा भाग आहेत. तरीही नदीचं पाणी गोड, तर समुद्राचं पाणी खारट असतं.

नदीच्या पाण्यातही मीठ असतं

पावसाचं पाणी खडक आणि मातीमधून वाहताना सोडियम, क्लोराइडसारखी खनिजं विरघळवून घेतं. मात्र त्यांचं प्रमाण खूप कमी असतं.

म्हणून नदीचं पाणी गोड लागतं

नदीतील मीठाचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे ते आपल्या जिभेला खारट वाटत नाही.

नदी सतत वाहत राहते

नदीचं पाणी एका ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे त्यातील मीठ आणि खनिजं साचत नाहीत.

सर्व मीठ शेवटी कुठे जातं?

नद्या वाहत-वाहत शेवटी समुद्रात मिळतात आणि त्यांच्यासोबत खनिजं व मीठही समुद्रात पोहोचतं.

समुद्राचं पाणी खारं कसं होतं?

सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राचं पाणी वाफ बनत. पण मीठ समुद्रातच राहून जातं.

लाखो वर्षांपासून सुरू आहे ही प्रक्रिया

नद्या सतत मीठ समुद्रात आणतात आणि वाफेमुळे फक्त पाणी उडतं. त्यामुळे समुद्रात मीठ जमा होत राहतं.

जलचक्राचं मोठं रहस्य

समुद्रातील पाणी वाफ बनून ढग तयार होतात, पाऊस पडतो, नद्या वाहतात आणि पुन्हा मीठ समुद्रात पोहोचतं.

समुद्राचं पाणी खारं असतं!

म्हणूनच नदीचं पाणी गोड आणि समुद्राचं पाणी खारं असतं!

भारतातील सर्वात श्रीमंत मशीद कोणती? मंदिरांप्रमाणे मशिदींमध्ये देणगी का दिली जात नाही?

येथे क्लिक करा