रोज 3 लिटर पाणी 30 दिवस पिलं तर काय होईल?

Rahul Shelke

पाणी इतकं महत्त्वाचं का?

आपल्या शरीराचा मोठा भाग पाण्याचा असतो. ते शरीरातील तापमानाचं संतुलन राखतं आणि घाण बाहेर काढायला मदत करतं.

3 Litres Water Daily | Pudhari

रोज 3 लिटर पाणी

तुम्ही खूप घाम गाळत असाल, व्यायाम करत असाल किंवा उष्ण ठिकाणी राहत असाल
तर 3 लिटर पाणी शरीरासाठी उपयोगी ठरू शकतं.

3 Litres Water Daily | Pudhari

त्वचा सुधारते

30 दिवस पुरेसं पाणी पिल्यावर त्वचा अधिक हायड्रेटेड दिसू शकते. कोरडेपणा आणि निस्तेजपणा कमी होऊ शकतो.

3 Litres Water Daily | Pudhari

डोकेदुखी कमी होण्याची शक्यता

कधी कधी पाणी कमी पिल्यामुळे डोकेदुखी वाढते. पाणी नियमित घेतलं तर अशा दुखण्यांमध्ये आराम मिळू शकतो.

3 Litres Water Daily | Pudhari

पचन सुधारू शकतं

पाणी पुरेसं घेतल्याने पचन हलकं होतं आणि बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) कमी होण्यास मदत होते. मलावरोधाचा त्रास कमी होऊ शकतो.

3 Litres Water Daily | Pudhari

किडनी स्टोनचा धोका कमी

पाणी जास्त प्यायल्यामुळे किडनीमध्ये खडे होण्याचा (स्टोन) धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

3 Litres Water Daily | Pudhari

सगळ्यांसाठी 3 लिटर पाणी गरजेचं नाही

तुम्ही कमी हालचाल करत असाल, थंड/मध्यम हवेत राहत असाल तर 3 लिटर पाणी जास्त होऊ शकतं. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं.

3 Litres Water Daily | Pudhari

जास्त पाणी पिलं तर काय होतं?

जास्त पाणी पिलं किंवा पटकन खूप जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील मीठ (सोडियम) कमी होऊ शकतं. यामुळे मळमळ, चक्कर, क्रॅम्प्स आणि झटकेही येऊ शकतात.

3 Litres Water Daily | Pudhari

योग्य पद्धत काय?

तहान लागल्यावरच प्या, पाणी हळूहळू प्या, हवामान/व्यायामानुसार प्रमाण वाढवा-कमी करा. आजारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3 Litres Water Daily | Pudhari

बिस्किटांना छिद्रं का असतात? कारणं ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

Biscuits Holes | Pudhari
येथे क्लिक करा