अंजली राऊत
ख्रिसमसची तयारी जोरात सुरू झाली आहे. या सणानिमित्त घरांत आणि दुकानांच्या बाहेर रंगीबेरंगी रोषणाई करण्यात येत आहे
ख्रिसमस निमित्त मुलांना ब्लूटूथ असलेले दिवे भेट देता येईल. हल्ली कार्टून कॅरेक्टर, चंद्र आणि ग्रह असलेले दिवे देखील बाजारात मिळत आहेत
लहान मुलांना रोबोटिक खेळणी, शैक्षणिक गेम्स, पुस्तके आणि आर्ट किट्स देखील चांगले पर्याय निवडता येतील.
आपल्या जवळच्या व्यक्तींना लोकरी स्कार्फ किंवा काश्मिरी शाल भेट देता येतील, हे गिफ्ट हिवाळ्यात उपयोगी येणारे गरम आणि सुंदर गिफ्ट असेल
क्रिसमस निमित्त सुगंधी वातावरण निर्माण करणारे मेणबत्त्या देखील एक चांगला पर्याय आहे. या मेणबत्या दिसायला खूपच सुंदर आणि घरातले वातावरण रीफ्रेश करणारे असतात.
तुमच्या बजेटनुसार कॉफी, मोका, वनीला आणि वुडी अरोमासारखे देखील अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
तसेच जवळच्या व्यक्तिंना गिफ्ट कार्ड्स, चॉकलेट्स, कुकीज, लहान झाडांची रोपे किंवा बायोडिग्रेडेबल बॅग्स देऊ शकता. हे सर्व उपयोगी पडणारे आणि आवडते गिफ्ट्स ठरतील