डॉ. बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाने काय म्हणायचे?

पुढारी वृत्तसेवा

रमाबाई आंबेडकर

आज (7 फेब्रुवारी) रमाबाई आंबेडकर यांची जयंती. पण तुम्हाला माहिती आहे का, बाबासाहेब त्यांना कोणत्या नावाने हाक मारायचे?

Ambedkar | Pudhari

बाबासाहेबांसाठी ‘रामू’

बाबासाहेब आपल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांना प्रेमानं ‘रामू’ म्हणायचे. त्यांच्या पत्रांमध्येही रमाईंचा उल्लेख ‘रामू’ असाच आढळतो.

Ambedkar | Pudhari

इतिहासात रमाई

इतिहासाच्या पानांमध्ये रमाबाईंविषयी फारसं लिखाण आढळत नाही. लेखक ज.वि. पवार यांनी एका मुलाखतीत, त्या काळातील सामाजिक मानसिकतेमुळे महिलांचं योगदान दुर्लक्षित राहिलं असं सांगितलं आहे.

Ambedkar | Pudhari

बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाई

घर, मुलं, आजारपण, आर्थिक अडचणी हे सगळं सांभाळत रमाईंनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि संघर्षासाठी स्वतःला झोकून दिलं.

Ambedkar | Pudhari

पत्रांतून दिसतं त्यांचं नातं

बाबासाहेब आणि रमाई यांच्यातील पत्रव्यवहारातून त्यांचं प्रेम, आपुलकी आणि एकमेकांवरील विश्वास दिसतो.

Ambedkar | Pudhari

संघर्ष

मुलांचा मृत्यू, गरिबी, समाजाचा विरोध, हे सगळं रमाईंनी मुकाट्याने सहन केलं.

Ambedkar | Pudhari

‘रामू’ ते ‘रमाई’

बाबासाहेबांसाठी त्या ‘रामू’ होत्या… पण पुढे त्या आंबेडकरी जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या ‘रमाई’ बनल्या.

Ambedkar | Pudhari

शिक्षणाच्या लढाईमागची ताकद

बाबासाहेबांनी कोट्यवधी लोकांना शिक्षणाची प्रेरणा दिली, पण त्या शिक्षणामागे उभी होती रमाबाईंची त्यागमूर्ती सावली.

Ambedkar | Pudhari

रमाईंना विनम्र अभिवादन

आज रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ज्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना बळ दिलं.

Ambedkar | Pudhari

प्रत्येक वेबसाइटवर CAPTCHA का विचारला जातो? तुम्हाला माहितेय का?

CAPTCHA | Pudhari
येथे क्लिक करा