पुढारी वृत्तसेवा
उन्हाळा आला की शरीर थकायला लागतं, उष्णतेमुळे डोके गरगरतं. अशावेळी एक ग्लास थंडगार कैरीचं पन्हं पिलं की बरं वाटतं.
कैरीचं पन्हं शरीराचं तापमान नियंत्रित करतं. अंतर्गत उष्णता कमी करून शरीराला आतून थंडावा मिळतो.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी झपाट्याने कमी होतं. पन्हं शरीरातील पाणी आणि क्षारांचं संतुलन (Electrolyte balance) टिकवून ठेवतं.
उष्माघात (Heatstroke) हा उन्हाळ्यात मोठा धोका असतो. पन्हं शरीराला उष्णतेपासून संरक्षण देतं आणि उष्माघात टाळायला मदत करतं.
नैसर्गिक साखर आणि पोषक घटकांमुळे पन्हं शरीराला ऊर्जा देतं. अशक्तपणा आणि थकवा पटकन कमी होतो.
कैरी, जिरे, काळं मीठ, पुदिना यामुळे पचनक्रिया सुधारते. ॲसिडिटी, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होतो.
पन्ह्यात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.
इतर थंड पेयांपेक्षा पन्हं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. हे घरगुती शीतपेय आहे.
अति प्रमाणात पन्हं घेतल्यास साखरेमुळे वजन वाढू शकतं. जास्त थंड पन्हं घेतल्यास काहींना त्रास होऊ शकतो.
दररोज एक-दोन ग्लास पन्हं पुरेसं आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवा आणि कैरीच्या पन्ह्याचा आनंद घ्या.