दलाई लामा यांच्या दैनंदिन सवयींपासून विद्यार्थ्यांनी काय शिकावे?

पुढारी वृत्तसेवा

प्रेम, करुणा, धैर्य आणि नैतिक शिस्तीचे प्रतीक असणारे तिबेटी आध्यात्मिक नेते १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्योत्सो यांनी ६ जुलै रोजी ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे.

दलाई लामा यांच्‍या दैनंदिन सवयी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात.

दलाई लामा आपल्या दिवसाची सुरुवात ध्यानधारणेने करतात. विद्यार्थ्यांनीही दररोज ५ ते १० मिनिटांचे ध्यान करून मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न करावा.

करुणा जोपासा : इतरांशी सौम्य आणि मदतीचा दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे.

आपण काय ग्रहण करतो याची जाणीव ठेवा : सोशल मीडियावरील नकारात्‍मकता टाळा.

दलाई लामा दररोज वाचन करतात आणि मिळालेल्या माहितीवर चिंतन करतात. विद्यार्थ्यांनीही स्व: प्रगतीसाठी वाचन व आत्मचिंतनाचा सवय लावावी.

यश कितीही मोठे असले तरी नम्रता आणि कृतज्ञतेची भावना जोपासा. सतत नवीन शिकण्याची तयारी ठेवा.

तुलना तणाव निर्माण करते. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःला उत्तम बनवण्यावर लक्ष केंद्रित करा.

शिक्षण हे केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नसून वैयक्तिक विकासासाठी आहे. सदैव जिज्ञासू राहण्याचा प्रयत्न करा.

प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य पद्धतीने उत्तर देणे शिका. रागावर नियंत्रण ठेवा.

Canva

लहान गोष्टींपासून सुरुवात करा,आज एक सवय अंगीकारा. शांत राहा, एकाग्र रहा.

येथे क्‍लिक करा